Monday 30 September 2013

आजचा सुविचार

स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.

आजची बोधकथा  

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि
तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....

तात्पर्य:

प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या
लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात .......
 
Saturday 28 September 2013

आजचा सुविचार

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

आजची बोधकथा 

 "सांगली जवळील खेड्या मध्ये एक वृद्ध माणूस राहत होता, त्याची इच्छा होती कि घरासमोरील अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण हे खूप कष्टाचे काम आहे, ........ आणि दुर्दैवाने त्याचा मुलगा तुरुंगात होता, त्यामुळे हे कसे होणार, असे म्हणून तो आपल्या मुलाला एक पत्र लिहितो,

"राजू,
तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती कि आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण त्यासाठी सारे आंगण खोदावे लागणार, मी तर थकलो आहे, तू इथे असतास तर मदत झाली असती"

दोनच दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून पत्र आले,

" बाबा, कृपया करून तुम्ही आपले आंगण खोदू नका, तिथे मी पिस्तुल व कार्तुस लपविली आहेत"

दुसर्या दिवशी सकाळी पूर्ण मुंबई पोलीस सांगली मध्ये दाखल झाली, त्यांनी पूर्ण आंगण खोदले पण त्यांना काहीच मिळाले नाही.

लगेच मुलाचे पत्र आले, " बाबा आंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा" ............ इथे बसून मी तुमच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे हेच करू शकतो.

तात्पर्य :- मनापासून काहीही करायचे ठरविले तर ते नक्की होते, मग तुम्ही दुसर्या गावी असूद्यात किंवा परदेशात असूद्यात.
एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील ट्रेन ने जात असतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे
जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात.
           त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
          तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...” तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो......
          ”तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..”
          आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत, माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”
 
कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..
- See more at: http://marathibodhkatha.blogspot.in/2011/10/blog-post.html#sthash.xi6z84ZS.dpuf

Friday 27 September 2013

आजचा सुविचार

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

आजची बोधकथा  

एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते.

त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.'

तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत.

लिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,"
मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ?

फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.
मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.

फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे.
मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन.

फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात).
तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर...

मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद
दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ?

मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, .... पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते.

तात्पर्य :-
१) आमीर खान, राहुल द्रविड हे जन्मापासून परफेक्ट नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून, मेहनत करून ते परफेक्ट झाले.

२) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत राहिल्यास, प्रेमाच फुल कधीच कोमजणार नाही.

३) भारत देश असा, भारत देश तसा, ह्या भारताचे काहीच होणार नाही, असं म्हणत बसण्यापेक्षा, आपण भारतीय संस्कृती व भारताच्या सिद्धांताप्रमाणे खरोखर वागतो कि नाही, वआपण भारतासाठी काय करू शकतो हे पाहणे जास्त जरुरीच आहे.
- See more at: http://marathibodhkatha.blogspot.in/2013/04/perfect.html#sthash.uyOMYHVS.dpuf
"एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,"

Thursday 26 September 2013

 आजचा सुविचार

माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.

आजची बोधकथा  

"एका माणसाने आपला नेहमीचा वेष बदलला, ......... दाढी वाढविली, गळ्यात
सोन्याची जाड चेन, हातात ३ जाडजूड अंगठ्या घातल्या व भारतातील सर्वात
मोठ्या महाविद्यालयातील मुख्यधापकाकडे नोकरी मागण्यासाठी गेला,
 
माणूस :- नमस्कार, मी विद्यार्थाना अतिशय चांगल शिक्षण देईन, चांगले संस्कार लावेन असे मी आश्वासन देतो ... मला नोकरी द्या. 

मुख्यधापक :- इथे अतिशय उच्चशिक्षित लोकांना सुद्धा नोकरी मिळणे अवघड आहे, तसेच तुम्ही तर एका गुंडा सारखे दिसता, तुम्ही आमच्या विद्यार्थांचे आणि ह्या महाविद्यालयाचे भवितव्य काय घडविणार ?
 
माणूस :- ठीक आहे तर मग मी ह्या महाविद्यालयाचे विश्वस्त जे भारताचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो. 

मंत्री :- मुख्यधापक जे म्हणत आहेत ते बरोबर आहे ......... महाविद्यालयात सुशिक्षित
शिक्षकाची गरज आहे, तुमच्या सारखे लोक  विद्यार्थांचे व ह्या महाविद्यालयाचे भवितव्य
कसे घडवू शकणार ?
 
(हे ऐकून तो माणूस हसू लागतो ........ आपला खराखुरा वेष समोर आणून म्हणतो....)
माननीय मुख्यधापक व मंत्री साहेब ......... जर एका महाविद्यालयाचे व विद्यार्थांचे भवितव्य घडविण्यासाठी अतिशय उच्चशिक्षित शिक्षकाची जरुरी आहे, तर आपल्या ह्या मोठ्या भारत देशाचे व भारत वासियांचे भवितव्य घडविण्यासाठी सुद्धा नगरसेवकापासून ते पंतप्रधानांपर्यंत उच्चशिक्षित लोकांची गरज आहे.
मी माझी वेशभूषा बदलून तुमच्यापर्यंत तुम्हाला हीच गोष्ट पटवून देण्यासाठी आलो होतो ....... कृपया भारत देशाला महाविद्यालया एवढेच महत्व देऊन उच्चशिक्षित लोकांची भरती आपल्या सरकार मध्ये करावी.

Tuesday 24 September 2013

 आजचा सुविचार

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

आजची बोधकथा 

!!एक दिवसाचा पांडुरंग ..... 
"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा"
पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"

( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )

पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "

(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )

तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"

(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)

रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"

गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.

तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही .. गोकुळ मान खाली घालून उभा राहतो ..........
पांडुरंग पुढे म्हणतो .........
अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.

त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो"

तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.

 आजचा सुविचार

या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.

आजची बोधकथा 

रुमाल

‘ रुमाल ’ हा शब्द मोठा मजेशिर आहे . लहाणपणी गावात रुमालमध्ये लोक सामान , भाजीपाला बांधून नेत असल्याचे मी पाहिलेले आहे . त्यामुळे ‘ रुमाल ’ म्हणजे भाजीपाला बांधून नेण्यासाठीजवळ बाळगावयाचा चौकोनी कापड . असा लहानपणी माझा समज होता . अर्थात वाढत्या वयाबरोबर हा गैरसमज असल्याचेही लक्षातआले. दुपट्टा आणि रुमाल हे एकाच कुळातले , पण दुपट्टा आकाराने मोठा म्हणून तो रुमालाचा मोठा भाऊ! तसेच शहरी भागात कुणी फारसा दुपट्टा वापरत नाही . शहरात रुमाल वापरतात आणि ग्रामिण भागात गळ्यात दुपट्टा टाकलेले लोक हमखास भेटतात . या अर्थानेदुपट्टा हा खेड्यात राहणारा तर रुमाल हा त्याचाशहरात राहणारा भाऊ! स्वातंत्र्याचे म्हणाल तर दुपट्टा अधिक स्वतंत्र आहे .तो गळ्यात छानपणे लोंबकाळत असतो. मस्तपैकी ताजी हवा खात असतो . पण रुमालाला फडकवण्याचे स्वातंत्र्य नाही. त्याची सदा घडी केलेली आणि खिशात कोंबलेली . स्वच्छ – मोकळी हवा रुमालाच्या नशिबातनाही पण काही का असेना ! रुमाल आणि दुपट्टा हे दोघेही अत्यंत उपयुक्त हे मात्र तितकेच खरे . सर्दी झाली असेल , तर हे सत्य मान्य करायला मिनिटभर वेळ लागणार नाही . असेच एकदा एकटी बसली होती . रुमाल काढला . त्याने चेहरा पुसला ! रुमालाकडे मी निरखून पाहीले एखाद्या परोपकारी व्यक्तीने दुसर्‍याचे कष्ट आपल्या अंगावर घ्यावे त्याप्रमाने रुमालाने माझा घाम टिपुन घेतला होता . गंमत म्हणुन मी त्या रुमालाला गाठी पाडायला सुरुवात केली . पहिली गाठ पाडली , मग दुसरी , मग तिसरी, अशा जेवढ्या गाठी येतील तेवढ्या गाठी मी त्या रुमालाला पाड्ल्या. आता तो रुमाल न दिसता गाठी पाडलेल्या एखाद्यादोरी सारखा दिसत होता . त्याच्या त्या रुपाकडे पाहून माझ्या मनात विचार आला , “ आता हाघाम पुसू शकेल काय ? ” अर्थातच त्या गाठिच्या रुमालालाघाम पुसणे शक्य नव्हते . मन आणखी पुढे विचारकरू लागले . रुमाल हा आमचे व्यक्तिमत्त्व , वाईट सवई या गाठिसारखा ! त्या जडल्या की व्यक्तिची उपयुक्तता संपली 
तात्पर्य :- वाईट सवई जडल्या की व्यक्तिची उपयुक्तता संपली.

Monday 23 September 2013

यू - डायस साठी सूचना

आजचा सुविचार

समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षकांमुळे होतो.

आजची बोधकथा 

एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे.
 अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला. रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला, ‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’

 तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या  लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.

Sunday 22 September 2013

आजचा सुविचार 

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

आजची बोधकथा

एका गावात एक वृद्ध महिला राहत होती, तिच्या कंजुशीची चर्चा गावभर होती, एका मुलाने तिला याबद्दल अद्दल घडविण्याचे ठरविले. तो त्या महिलेच्या घरी गेला व तिला तिचा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगू लागला. तिने त्याला नाते असण्याचे नाकारले. कारण तो तिथे राहिला तर तिला खर्च पडला असता ना!. बाहेर खूप पाऊस पडत होता. होय नाही करत किमान पावसाचे कारण सांगत त्या मुलाने तिच्या घरात प्रवेश मिळवला. तिने त्याला घरात प्रवेश तर दिला पण मुलगा काही खायला मागेल म्हणून ती म्हणाली, माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही, तेंव्हा गुपचूप पडून राहा. तेंव्हा तो मुलगा म्हणाला, आजी मी तुला काहीच खायला मागणार नाही कारण माझ्याकडे जादूची छडी आहे. तिच्या सहाय्याने मला काय पाहिजे ते बनविता येते. तू फक्त मला चूल, पातेले आणि पाणी दे, मी छडीच्या सहाय्याने आज खीर खाणार आहे. पाहिजे तर तुला पण खायला देतो. महिलेने पण खूप दिवसात खीर खाल्ली नव्हती. त्याने चुलीवर पातेल्यात पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले. काही वेळाने आपल्या जवळची छडी काढून त्याने त्या पाण्यातून फिरवली व त्या पाण्याची चव घेतली व म्हणाला, आजी खीर खूप छान झाली आहे पण यात जर तांदूळ आणि साखर असती तर ना खूप मज्जा आली असती. महिलेने विचार केला थोडे तांदूळ आणि साखर दिली तर काय बिघडते. तिने दिले. त्याने थोड्या वेळाने परत अजून दुध, वेलची आणि सुका मेवा मागितला. महिलेने खिरीच्या लोभापायी तो दिला. खीर तयार झाली. महिलेने व त्या मुलाने एकत्र बसून खाल्ली. महिलेने हा जादूच्या छडीचा चमत्कार मनाला व मुलाने कंजूष महिलेच्या घरी खीर खाल्ली.

तात्पर्य - बुद्धीच्या जोरावर संकटकाळातही आपण आपले काम सध्या करू शकतो.

Saturday 21 September 2013

तंत्रज्ञानातील प्रगती

तंत्रज्ञानातील प्रगती
      
         माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शालेय शिक्षणासाठी अनेक नव्या संधी उपलव्ध झाल्या आहेत. आतापर्यंत शिक्षणाचे माध्यम पुस्तकी स्वरुपात होते व प्रत्यक्ष शिक्षण अनिवार्य होते. साहजिकच यासाठी पुस्तकांची वा शिक्षकांची कमतरता वा प्राविण्य या अडचणी शालेय शिक्षणापुढे होत्या. माहिती तंत्रज्ञान व दूरस्थ शिक्षणाच्या सोयीमुळे असे अनेक प्रश्न सहज सुटणार असून विचार व माहितीची देवघेव, शिक्षणातील सर्व घटकांचा सक्रीय सहभाग आणि शिक्षणाचा दर्जा अत्युच्च राखणे शक्य होणार आहे. शालेय शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा असे चार मुख्य घटक असतात तर समाज हा त्याचा परिसर आहे. शिक्षणाच्या बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत अनेक पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर शिक्षणाचे नियोजन, विद्यार्थी, वय या सर्व बदलणाऱ्या गोष्टी आहेत. जरी अभ्यासक्रम एकच असेल तरीही शाळा, शिक्षक, शहर वा खेडे तसेच इतर अनेक घटक यामुळे शिक्षणाचा दर्जा बदलतो व त्यात एकवाक्यता, सुसूत्रता येत नाही. यासाठी या सर्व घटकांचे संघटन करणे व उत्कृष्ट शिक्षणपद्धतीचा अवलंब सर्व स्तरावर पोहोचेल असा प्रयत्न करणे आवश्क आहे.
          एरवी अशक्य वाटणारे हे काम इंटरनेटच्या साहाय्याने अगदी सहजसाध्य झाले आहे. अनेक शाळा एकमेकांशी जोडणे, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व माजी विद्यार्थी यांची एकसंध फळी निर्माण करणे, प्रत्येक पायरीवरील अभ्यासक्रमाचे संकलन करून त्यातील प्रभावी पद्धतीची निवड करणे शालेय शिक्षणाचे एक मध्यवर्ती आभासी केंद्र करून साध्य करता येतील.
अमेरिकेत अशा Educational portal चा वापर केला जातो व त्यातून अभ्यासक्रमातील सुधारणा, शिक्षकांना मार्गदर्शन तसेच आदर्श शिक्षणपाठ यांची माहिती सर्वांना उपलब्ध करून देता येते. सर्व घटकांच्या सक्रिय सहभागाने फार मोठे कार्य होऊ शकते व पुनरुक्ती टळते. तसेच यासाठी खर्चही कमी येतो.

नविन तंन्त्रज्ञानाचे फायदे

1.      विद्यार्थी, शिक्षक व माजी विद्यार्थी यांचे माहिती संकलन व संपर्क व्यवस्थापन.
2.      शिक्षणासाठी आवश्यक संदर्भग्रंथ व साहित्य यांची सूची.
3.      अडचणी व सूचना यांचे संकलन तसेच त्यावर उपाययोजना, मार्गदर्शन
4.      निरनिराळया शाळांतील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना त्यांच्या आवडीनुसार आंतरशालेय गट करून विविध क्षेत्रांत कार्य वा संशोधन प्रकल्प
5.      संगणकाचा वापर केवळ करमणुकीसाठी न होता तो सर्वांशी संपर्क साधण्यासाठी व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून वापरण्याची सवय विद्यार्थी व शिक्षक यांना लागेल.