आई मला नेहमी म्हणायची की कमी पैशाची का
असेना पण तू सरकारी नोकरी करावी याला दोन करणे होती ती म्हणजे एक तर आमची गरीब
परिस्थिती आणि दुसरी म्हणजे तिची अशी धारणा होती की एकदा सरकारी नोकरी लागली की
परत कोणी म्हणून कोणी सुधा नोकरीवरून काढून टाकत नाही..... मग सरकारी नोकरी
मिळवायची म्हणजे लवकरात लवकर आणि सहजासहजी मिळणारी नोकरी म्हणजे शिक्षकाची नोकरी
मला डोळ्यासमोर दिसू लागली... बारावी मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आणि डी.एड.
करायचे असा मी निश्चय केला आणि इयत्ता सातवीमध्ये असतानाच मनाशी पक्के ठरवले की
वाणिज्य शाखेतून अकरावी आणि बारावी करायचे चांगले मार्क्स मिळवायचे आणि डी. एड.
करायचे..... आणि शिक्षक व्हायचे.... कारण त्यावेळी असे समजले जायचे की एकदा का डी.
एड. ला एडमिशन मिळाले की तो शिक्षक झालाच म्हणून समजा..... कारण डी. एड. ला सहसा
कोणी नापास होत नसे.... माझा निर्धार पक्का झाला होता मी डी.एड. करून शिक्षक
होण्याचे निश्चीत केले होते....
दहावीला मला ८० टक्के मार्क्स मिळाले आणि
सर्वांचे सल्ले सुरु झाले.... सायन्स घे.... इंजिनियरिगला जा.... मेडिकलला जा...
हुशार आहेस..... डी. एड. करू नकोस.... आम्ही मदत करू.... कोणीही डोनर मिळतील....
काही अडचण येणार नाही.... एवढ्या टक्केवारीच्या मुलांनी डी. एड. करू नये... असे एक
न एक अनेक सल्ले मिळत होते.... कोणी प्रेमापोटी सांगत होते...