Sunday, 26 January 2014


                मा.सरपंच (वरकुटे म्हसवड) यांच्या हस्ते ध्वजारोहण 




                  ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी

Saturday, 11 January 2014

दिनांक ३ जानेवारी रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व दिनांक १२ जानेवारी २०१४ रोजी राजमाता जिजाऊ या दोन महान स्त्रीरत्नांची जयंती संपूर्ण देश साजरी करत आहे. त्यानिमित्त मूळनिवासी सभ्यता संघ निर्मित जिजाऊ वंदना व सावित्रीबाई यांची अशोक राणा लिखित व डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. वैशाली पवार व इतरांनी गायीलेली व डॉ. रवींद्र श्रावस्ती यांनी निवेदित केलेली  गीते आपल्यासाठी व विध्यार्थ्यांसाठी या ठिकाणी लिंक देत आहे.








 

                                    



                                   २) जिजाऊ वंदना







(एम. डी. चंदनशिवे, पदवीधर शिक्षक, केंद्रशाळा वर- मलवडी  यांचे संग्रहातून साभार, मो. नं. ९४२३८२७५११)

Monday, 6 January 2014

!!! एक नवी जिम्मेदारी !!!

विध्यार्थी हे दैवत माझे 
माझा विश्वास असे ...
प्रत्येकाचे रूप मनोहर
घडविण्या मी सज्ज असे ... 








माण तालुक्यातील आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी माझ्या मार्डी केंद्रातून माझी निवड करण्यात आली. हा पुरस्कार तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे, पंचायत समिती सभापती श्रीरामभाऊ माने पाटील, उपसभापती वसंतराव जगताप, गटविकास अधिकारी श्रीम. सीमा जगताप यांच्या हस्ते पुरस्काररूपी नवी जिम्मेदारी मी स्वीकारली आहे.... हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी करत असलेले काम अधिक चांगल्या पद्धतीने करावे यासाठीच हा कौतुक सोहळा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे... माझ्या केंद्रातील सर्व शिक्षक व माझा सर्व मित्र परिवार यांच्या सहकार्याने मी माझी हि नवी जिम्मेदारी मी सहज पार पडू शकेन याचा मला पूर्ण विश्वास आहे.... कारण माझे केंद्रप्रमुख श्री दारासिंग निकाळजे, विस्तार अधिकारी श्री लक्ष्मनराव पिसे साहेब, व गटशिक्षणाधिकारी श्री. वामनराव जगदाळे साहेब यांची माझ्या पाठीवर असणारी थाप मला नेहमीच नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा, उर्जा, आणि बळ देत असते....
हो विफल क्यो साधना,
जब आराधना परिपूर्ण हो...
हो विफल क्यो यज्ञ कोई,
जब प्रार्थना परिपूर्ण हो.....
अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश सर्वत्र पोहोचविण्यासाठी सुरु केलेला यज्ञ सफल होण्यासाठी सर्व काही करण्याची तयारी ठेऊन वाटचाल सुरु आहे..... आतापर्यंत दिलेल्या साथीने व सहकार्याने मी आपल्या सर्वांचा सदैव कृतज्ञ व ऋणी आहे.... उत्तरोत्तर अशीच साथ मिळेल या अपेक्षेसह ....... राम सालगुडे
आदर्श प्राथमिक शाळा बिदाल पुनर्वसन
या शाळेत गेल्यावर एखाद्या खाजगी इंग्लीश शाळेला देखील लाजवेल असे वातावरण पाहायला मिळाले या शाळेतील शिक्षक श्री संजीवन जगदाळे यांनी अतिशय मेहनतीने या शाळेचे वातावरण तयार केले आहे. या शाळेत इंटरनेटचे कनेक्शन असून प्रोजेक्टर द्वारे विध्यार्थ्यांना शिकवले जाते. या शाळेत असणारा बायोगॅस प्रकल्प हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून या शाळेतील शालेय पोषण आहार या बायोगॅस द्वारे शिजवला जातो हे विशेष. शाळेची रंगरंगोटी, सजावट, गुणवत्ता याविषयी काय बोलावे जे प्रत्यक्ष पहिले ते शब्दात वर्णन करणे फार अवघड आहे सर्वांनी आवर्जून भेट द्यावी अशी माण तालुक्यातील एक आदर्श शाळा असेच वर्णन या शाळेचे करावे लागेल. या शाळेच्या विकासात जगदाळे सरांनी लोकसहभाग मिळवून शाळेचा कायापालट घडवून आणला आहे यामध्ये डॉ. सुरेश जगदाळे,(सिव्हील सर्जन सातारा), मेघदूत मदने (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), एस. एन. फडतरे (टेलर) प्रतापराव भोसले, बिदाल गावचे सरपंच, उपसरपंच यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या शाळेकडे संपूर्ण तालुका एक ROLL MODEL म्हणून पाहत आहे. जगदाळे सरांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मीही त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत आहे... सर्वांसाठी त्यांचा फोन नं. मी येथे देत आहे ९८६०७१४०४०

Wednesday, 1 January 2014

सुविचार व बोधकथा



आजचा सुविचार
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
आजची बोधकथा
एकदा गुरुनानक सुलतानपूरच्या नवाबाकडे घरी गेले. नवाबानी गुरुदेवांचे आत्मीयतेने स्वागत केले. त्यानंतर दोघांच्यामध्ये धर्मावर चर्चा सुरु झाली. नवाबानी म्हटले, आपण हिंदू-मुस्लीम यामध्ये काहीच अंतर करत नाही. त्यामुळे आज तुम्ही माझ्याबरोबर नमाज अदा करण्यासाठी चला. नानकदेव म्हणाले,देणारा एक आहे आणि घेणारा एक आहे तर मी कोण अंतर करणारा? चला मशिदीत चला. दोघेही मशिदीत गेले. नवाबसाहेब नमाज अदा करू लागले, नानकही ध्यानमग्न होवून एका मुद्रेत उभे राहिले. नमाज होताच नवाब म्हणाले, आपण तर नमाज अदा केली नाही. नानक म्हणाले, "माफ करा! आपण जेंव्हा नमाज अदा करत होता तेंव्हा माझे मन माझ्या स्वामींकडे होते. त्या वेळी मला आपल्या स्वामींच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. मात्र आपले लक्ष नमाजाकडे कमी आणि माझ्याकडे जास्त होते काय? आपण देवाचा धावा करतो तेंव्हा आपले मन हे दुसऱ्या कोणत्या गोष्टीत जायला आहे." नवाब खजिल होवून म्हणाले, "खरे आहे! माझे लक्ष तुम्ही काय करता यात लागले होते. आम्ही देवाकडे काही तरी मागणी करण्यासाठी येतो तर तुम्ही फक्त देवासाठी इथे येता." गुरु नानक म्हणाले,"आपण सारी एकाच ईश्वराची लेकरे, नावे वेगळी दिली तरी देव बदलतो काय? तो सर्व पाहत आहे."
तात्पर्य-
ईश्वर एक आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्ताची गरज आहे.