Sunday, 14 December 2014

ब्लॉग वर पहिली पोस्ट कशी प्रसिद्ध कराल / How to publish a post on your Blog Site

नमस्कार, 
             नवीन शैक्षणिक ब्लॉग कसा तयार करावा हे आपण मागील पोस्ट मध्ये पहिले. (शैक्षणिक ब्लॉग कसा तयार कराल) आता या लेखात आपण नवीन ब्लॉग वर पहिली पोस्ट कशी प्रसिद्ध करावी याविषयी माहिती मिळवूया.

१) आपण आपला इमेल आयडी व पासवर्ड वापरून आपल्या ब्लॉगच्या Dashbord वर या 
२) आपल्या ब्लॉगच्या नावावर क्लिक करा.
३) किंवा ब्लॉगच्या नावासमोर दिलेल्या पेन्सिलआयकॉन वर (create new post ) क्लिक करूनही आपण नवीन पोस्ट लिहू शकतो.
४) आपल्या ब्लॉगच्या नावावर क्लिक केल्यावर आपणास ब्लॉग चा overview दिसेल 
५) यामध्ये डाव्या बाजूला सगळ्यात वर new post वर क्लिक करा. 
६) आता एक नवीन पेज उघडेल जे word किंवा notepad सारखे असेल.

७) यामध्ये आपणास हवा तो मजकूर लिहिता येयील. सगळ्यात आधी वरच्या बाजूस post title मध्ये आपल्या पोस्ट चे नाव द्यावे. हे नाव आपण इंग्रजी किंवा मराठीत देऊ शकतो. word किंवा notepad मध्ये type करून इकडे कॉपी पेस्ट केले तरी चालेल.
८) आपण लिहिलेला मजकूर लहान-मोठा करू शकतो. 
९) Bold, Undreline, Italik हे सर्व formating tools आपण वापरून आपण आपला मजकूर सजवू शकता. 
१०) Text चा colour हि आपणास बदलता येतो.
११) सर्व मजकूर लिहून आणि त्याला हवा तसा सजवून झाल्यावर आपण तो publish करू शकतो.
१२) वरच्या बाजूला उजव्या कोपर्यात publish, Save, आणि preview हे पर्याय आहेत. preview मध्ये आपणास आपली पोस्ट ब्लॉग वर कशी दिसेल हे पाहता येते. 
१३) आपणास आपली पोस्ट लगेच publish करायची नसेल तर आपण save करून ठेऊ शकतो. 
१४) शेवटी आपण publish वर क्लिक केल्यानंतर आपली पहिली पोस्ट सर्वांसाठी खुली होईल. 
१५) आपली पोस्ट आपल्या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्वांना दिसेल सार्वजन ती पोस्ट वाचू शकतील. तसेच तिकडे प्रतिक्रिया लिहू शकतील.

2 comments:

  1. राम, अतिशय छान माहिती दिली आहे. मात्र आम्हाला काहीतरी ठेवा सांगण्यासारखे. त्यावर एक पर्याय असू शकतो की आपण मला ब्लॉगविषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी नेमू शकता. आपण आता फार मोठे झाला आहात. फार मोठ्या माणसांच्या फोन क्रमांकाचा माझ्या मोबाईल संचाला झेपत नाही, त्यामुळे मी तो डिलीट केला आहे. मी आपल्या लक्षात असेल तर कळवावे.
    धन्यवाद!
    व्यंकटेश कल्याणकर
    +91-98901 04827

    ReplyDelete
  2. Packers and Movers in noida
    Get a list of top 8 Licensed, Insured, Pre-screened & Reliable Packers and Movers, and Movers and Packers. Request free quotes to compare and select the best one.
    Packers and Movers in delhi
    Packers and Movers in gurgaon
    for more information please visit:
    http://www.top8list.in/

    ReplyDelete