Thursday, 18 January 2018

पोफळी

आपल्या अस्तित्वाने कोकणात बागांच्या बागा फुलवणारे आणि आपल्या नावाने कोकणचे सौंदर्य वाढवणारे पोफळीचे म्हणजेच सुपारीचे झाड... या सुपारीच्या झाडाला आमच्या शाळेच्या परिसराचा रहिवाशी करण्यासाठी आमची चिमुकली झटत आहेत... सरळसोट वाढून पंचवीस तीस फूट वाढणारे व शेंड्यावर नारळाच्या झावळ्या प्रमाणे थोड्याश्या झावळ्यानिशी आपले सौंदर्य खुलावणारे हे सुपारीचे झाड आपल्या शाळेत अतिशय कुतूहलाने, प्रेमाने व उत्सुकतेने जपण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न मुले करत आहेत.
मुळचे मलेशियाचे हे झाड समुद्रकिनारी, अतिपावसात, थंड व दमट वातावरणात अतिशय आनंदाने डौलात उभे असते... या झाडाला कमी पावसात थंड व कोरड्या तसेच उन्हाळ्याच्या कडक उन्हाळी वातावरणातही या झाडाला पाण्याबरोबरच मायेचा व प्रेमाचा ओलावा देऊन आम्ही हे झाड वाढवणारच अश्या आवेशात मुलांनी हे झाड लावले आहे.
कोकणच्या तांबड्या मातीतले हे झाड तांबूस करड्या माणदेशी मातीत मिसळून हळू हळू रुजण्याचा प्रयत्न करत आहे.

बघू या.... या झाडाच्या
व मुलांच्या प्रयत्नाला कितपत यश येते ते...

Special Thanks to
Ganesh Padule and Ramnath Bane

No comments:

Post a Comment