Friday, 20 December 2013

सुविचार व बोधकथा



आजचा सुविचार
तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
आजची बोधकथा
एका गावात एक दुष्ट शिकारी राहत होता. तो दररोज जंगलात जावून पशु पक्षांची शिकार करत असे. एकेदिवशी त्याचा जाळ्यात एक कबुतर मादी अडकली, तो तिला मारून खाऊ इच्छित होता. परंतु अचानक पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला. संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिळात हे कबुतर राहत होते. ज्या कबुतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने  दु:खी होता. कबुतर मादीने आपल्या पतीला दुखात असलेले पाहिले, ती भावनावश झाली ती कबुतराला म्हणाली," मला या शिकाऱ्याने पकडले आहे, परंतु या वेळी तो आपला अतिथी आहे. तू माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे. शिकारी थंडीत कुडकुडत आहे." कबुतराने झाडाची सुकलेली पाने आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली. त्यामुळे त्याला ऊब मिळाली, शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती. कबुतराने शिकाऱ्याची भूक भागविण्यासाठी त्या आगीत उडी घेतली. कबुतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दु:खी झाली. हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली. ज्या पक्षांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अग्नीच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते. हे उपकार फेडण्यासाठी त्याने कबुतर मादीला मुक्त केले. पण कबुतर मादीने पतीच्या आठवणीने व्याकूळ होवून आगीत उडी घेतली. शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याच्या मूर्खपणाने दोन जीवांचा संसार उध्वस्त झाला होता.
तात्पर्य - माणसाची सुस्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे. ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येवू शकते.

Tuesday, 17 December 2013

सुविचार व बोधकथा

आजचा सुविचार
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
आजची बोधकथा
संत रज्जब नेहमीच सर्वोच्च शक्तीच्या स्मरणात मग्न राहत असत. ना कधी वाईट वागत न वाईट विचार करत. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकास ते समान वागणूक देत, सदाचरणाबद्दल सांगत, प्रेमळ व गोड वाणीने बोलत. रज्जब आपल्या गावातील लोकांचे श्रद्धाकेंद्र बनले होते. गावातील लोक त्यांचे विचार ऐकत असत आणि व्यवहारात आचरण करत असत. एकेदिवशी परगावचा जुबेर नावाचा एक तरुण त्या गावात कामाच्या शोधात आला होता. त्याला काम तर मिळाले परंतु पैसा हाती येताच तो दारूच्या आहारी गेला. दारू पिऊन तो लोकांना शिव्या देत असे. यामुळे एके दिवशी त्याने दारू पिऊन खूप हंगामा केला, लोकांना खूप काही बोलला आणि तोल ना सावरता आल्याने तो गटारीत जावून पडला. लोकांना वाईटसाईट बोलल्याने त्याला कुणी गटारीतून काढण्यास पुढे आले नाही. त्याचवेळी रज्जब तिथे आले. त्यांनी त्याला उचलले, त्याचे तोंड धुतले आणि जुबेरला म्हणाले,"अरे मित्रा! ज्या तोंडातून तू देवाचे नाव घेतले पाहिजे त्या तोंडातून दारू पितो आणि त्याच तोंडातून ईश्वर स्वरूप असलेल्या अनेक माणसाना शिव्या देतो हे चांगले नाही. हा माणुसकीचा सर्वात मोठा गुन्हा आहे. पण हे कळण्यासाठी जुबेर कुठे शुद्धीत होता. त्याला हे सर्व इतर लोकांनी सांगितले तेंव्हा तो स्वत:बद्दल जास्त वाईट वाटले. लोकांनी त्याला संतांनी केलेल्या सहकार्याची जाणीव करून दिली. या गोष्टीचा जुबेरवर खूप परिणाम झाला. त्याने संकल्प केला कि ज्या तोंडाला संतानी धुतले त्या तोंडातून आयुष्यात कधीच वाईट शब्द निघणार नाहीत. त्याने सात्विक जीवनमार्ग पत्करला. 
तात्पर्य-
संतांचे मार्गदर्शन नेहमीच चांगले असते, फक्त त्यानुसार आचरण करणे हे आपल्या हातात आहे. चांगले आचरण हि माणसाची ओळख आहे.

Monday, 16 December 2013

Rediscovering Yourself

How many times this can happen that you rediscover yourself and find that there is so much youthfulness and energy in you which carries the power to transform the life of so many people along with you. After being infected with the negativity surrounding you in this world and being influenced by the selfishness of this world, how come you get a refreshing dose of vigor and enthusiasm. This has to be the awakening of your sub-conscious. When the sub-conscious realizes its true potential you can attain the ideals that everybody yearns for. 

Human nature may be responsible for the peculiar behavior that one experiences in life. The fickle nature of our minds makes it really hard

आजचा सुविचार 
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
आजची बोधकथा

प्राचीन भारतात बालविवाहाची प्रथा होती. याचा मोठा दुष्परिणाम म्हणजे त्याकाळी मुलीना अशिक्षित ठेवले जायचे आणि एखाद्या मुलीचा पती मृत्यू पावल्यास तिला आयुष्यभर दुख:च सोसावे लागे. मेहनत आणि मजुरीशिवाय तिच्याकडे पर्याय नसे. अशीच एक गरीब बालविधवा पूर्व मथुरेजवळ राहत होती. ती एकटीच होती आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी ती पिठाची गिरणी चालवायची. एक दिवस तिच्या मनात गावातून शहराकडे जाणा-या रस्त्यावर एक विहीर खोदण्याचा विचार आला. कारण त्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नव्हती. मात्र त्या बिचाऱ्या गरीब विधवेकडे विहीर खोदून घेण्यासाठी पैसेही नव्हते. शेवटी तिने विचार केला कि दिवसभरात ती दोन आणे

Sunday, 15 December 2013

आजचा सुविचार

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

आजची बोधकथा

एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते.अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो.वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख

Memories


The moments that we spent together are the treasures of our life and nobody can steal them from us. These moments make us proud whenever we recall them, creating a sense of nostalgia which makes us forget all the worries about the present or future. They make us oblivious of our surroundings creating a fountain of blissful happiness which is priceless. There comes a moment when we are convinced that everything that we have set as our pursuits are in vain, that we have left behind what was most valuable to us-our childhood which was carefree, innocent , playful with a bliss which didn’t have any consideration for danger. It was freedom. We were stupid enough to be happy in those times. All the so called wisdom wipes away the happiness. Sometimes I wonder why do we grow up, how nice it would be if we remain a child for a lifetime!

Monday, 9 December 2013

Todays thought and Moral Story

आजचा सुविचार 

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

आजची बोधकथा

राजाचे आगमन झाले होते, लोक रांगेत उभे होते, राजांच्या मनात प्रजेबाबत आस्था होती कारण तो राजा प्रजेचे हित जाणणारा होता. राजाच्या रथाच्या पुढे मंत्री, सेनापती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रथ होते. सर्वात पुढे सैनिक गर्दीला नियंत्रित करीत होते. या जनसमुदायामध्ये एक अंध संन्यासी पण उभा होता. त्याला या अद्भुत सोहळ्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तो रांगेतून बाजूला उभा होता. जेंव्हा वाजंत्रीवाले जवळ आले, तेंव्हा सैनिक ओरडू लागले, "सरका ! दूर व्हा! बाजूला व्हा!" अंध संन्यासी म्हणाला,"समजले !" मंत्र्याचा रथ आल्यावरही त्याने संन्याशासहित सर्वाना तसाच दूर होण्याचा आदेश सुनावला. संन्याशी परत उत्तरले,"समजले". असेच सर्व सेनापतीचे रथ येताना झाले, त्यावेळेसही सैनिकाचे आणि संन्याशाचे वरीलप्रमाणेच म्हणणे आले. सर्वात शेवटी राजाचा रथ आला. संन्याशाला पाहताच राजा तत्काळ रथाच्या खाली उतरला आणि त्यांच्या पाया पडत म्हणाला,"आपण या गर्दीत येण्याचे का बरे कष्ट घेतले? आपण जर आज्ञा केली असती तर मी तुमच्या आश्रमात येवून तुमची भेट घेतली असती." संन्याशी या वेळीही म्हणाला,"समजले !!" राजाने संन्यासी वृद्धाला विचारले,"महाराज ! मी फारसे काही न बोलता आपण समजले असे म्हणता?" तेंव्हा संन्यासी म्हणाले,"आपल्या या सर्व लवाजम्यात मी फक्त आवाजावरून, उच्चारावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून काही निष्कर्ष काढले, ते माझे बरोबर आले त्याला मी समजले म्हणत होतो. सैनिकाचा, सेनापतीचा,मंत्र्याचा वेळेचा सूर हा वेगळा होता आणि मृदू आवाज हा केवळ राजाचा असू शकतो याची मला खात्री होती. राजा मनातून काय समजायचे ते समजला. त्याने त्या अंध संन्याशाला रथातून आश्रमात सोडण्याची व्यवस्था केली.

तात्पर्य-

विनम्रतेतून महानता प्रकट होत असते. त्यामुळे कितीही उंची मिळाली तरी अहंकारापासून दूर राहता आले पाहिजे. 


Sunday, 8 December 2013

SOLEMN CALLS
I often feel that deepest are the cries that are seldom heard. Our confrontations with our conscience are ineluctable and appear before us with time and again. Each time it happens, it urges a quest for our true identities to ameliorate ourselves, not necessarily by superfluous achievements that serve more as our portrait to others than a mirror to ourselves, but by our choice to take a higher path which brings our conscience in harmony with our actions.
According to Kurt Vonnegut, "We are what we pretend to be, so we must be careful what we pretend to be."
We all are pretending to be someone in one way or another; we fit every person in certain stereotypes within our sub conscience based on the stimulus we get. However, these stimuli may be erroneous and misleading. Now the important question is the selection of audience for our pretentious act, good audiences will make good characters. In my opinion, the best audience can be we ourselves because nobody else can better judge the extent of pretension. Hence, a better option would be trying to pretend honesty to ourselves.
The need of the above mentioned pithy lines was to reveal a certain character of ignorance that prevails so dominantly and still unnoticed. This ignorance in turn influences our choices and believe it or not, these choices are not for deodorants, jeans or vogue, but something critical such as our goals in life, our character, disposition and faith. The solemn calls are that of our conscience that are often subdued though not conspicuously. The
nuances that we are ignorant of have affected our lives so much and yet we are so acclimated to it that we could hardly notice it.
"Don't lose yourself; it's all you have got"
According to my contemplation (liable to scrutiny), the reason for losing our true self is the lack of faith. Standing by our convictions and beliefs commands faith in their veraciousness. Faith derived
from “The Changing” may wobble or depreciate, if you have faith in higher paths for humanity, it ought to be derived from higher purpose for life and divine inspirations. Impregnable faith in
righteousness and virtues is humanity. Faith can still move mountains.
                                                                  Vishwajeet Kushwaha
Contact:-+919741164902