Wednesday, 18 June 2014

एक चिंतन



      माणसाला परमेश्वराने सार काही दिल पण देताना मात्र त्याने कुणाला भरभरून सुख दिले.  कुणाच्या नशिबी अवहेलना, दु:ख प्रत्येक माणसाला घडविण्यामागे परमेश्वराचा चैतन्याचा काय उद्देश असेल संकटाच्या दरया पार करत आपल इच्छित धैर्य गाठण्यासाठी धडपडत, संघर्ष करत जीवन जगत असतो, तर कुणी नशिबाच्या साथीने यशाचे शिखर गाठतो.
      प्रत्येक जण जगत असतो.  प्रत्येक जण सुखासाठी धडपडत असतो.  प्रत्येकाच्या मागे प्रेरणा असते.  हा  परमेश्वर नावाचा बहुरूपी मात्र आपल्या सगळ्यांना त्याच्या इशा-यावर नाचवतो.  त्याच्या मनात पुढच काय आहे हे कुणालाच ठाऊक नसत.  अद्यापपर्यंत त्याचा कोणीच शोध लावू शकला नाही.
      विज्ञानाने मानवाने अनेक शोध लावले पण त्याचा शोध मात्र कोणालाही लागला नाही.  नाहीतर आपण अनेक नैसर्गिक संकटाना थोपवू शकलो नसतो का?  कर्ता करविता तो आहे.  सर्व काही त्याच्याच हातात आहे.  आपण फक्त कटपुतली प्रमाणे त्याचा इशा-यावर नाचत असतो.  देव कसा आहे?  कोठे आहे?  तो काय करतो?  किवा काय करणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही.  म्हणजे त्याची कल्पना पण आपण करू शकत नाही.  ईश्वर महान आहे.  ज्याप्रमाणे एखाद्या महासागराकडे पहिले असता त्याची सीमा कुठपर्यंत आहे हे लक्षात येत नाही जिकडे नजर फिरवावी तितके ते लांब वाटते किवा क्षितिजाकडे पाहिल्यानंतर कसे भासते कोठेतरी ते क्षितीज टेकले आहे.  पण तसे नसते.  ते आपल्याला तसे भासते.  कारण हे सगळ आपल्या विचारा पलीकडच आहे.
(गंगा सालगुडे)

आजचा सुविचार

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

आजचा दिनविशेष

झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन १८५८

राणी लक्ष्मीबाई
टोपणनाव: मनू
जन्म: नोव्हेंबर १९, इ.स.१८३५
काशी, भारत
मृत्यू: जून १८, इ.स. १८५८
झाशी, मध्य प्रदेश
चळवळ: १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
प्रमुख स्मारके: ग्वाल्हेर

आजची बोधकथा

एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांगमी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते! 

तात्पर्य : काहीजणांना आपण फार मोठे आहोत असं वाटतं. पण त्यांना लोक काडीची किंमत देत नाहीत।

Tuesday, 17 June 2014

शाळा प्रवेशोत्सव

जि. प. प्राथ. शाळा माळवाडी (वरकुटे-म्हसवड) येथे आज शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक संघ, पालक शिक्षक संघ, ग्रा.प.सदस्य, पालक, ग्रामस्थ यांचे  उपस्थितीत शिक्षण प्रवेशोत्सव साजरा करणेत आला. यावेळी नवागतांचे स्वागत, गुढीपूजन, प्रभातफेरी, पुस्तकवाटप, उपस्थिती प्रतिज्ञा, हळदी कुंकू आदि कार्यक्रम घेणेत आले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.छाया किसन खरात, उपाध्यक्षा सौ. अर्चना किसन निकम, सदस्य शंकर नामदेव दोलताडे, सदस्या विमल बाबुराव गायकवाड, मंगल नारायण वाघमारे, आनंदीबाई शिवाजी जाधव, सुभाष जाधव, नवनाथ बबन जाधव...इ पालकांच्याउपस्थितीत नवागतांचे स्वागत तसेच गुढीपूजन व पाठ्यपुस्तकांचे वाटप, करण्यात आले.
या कार्यक्रमाचे फोटो : 

आजचा सुविचार

जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

आजचा दिनविशेष

गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी
 
गोपाळ गणेश आगरकर  (१८५६-१८९५) -
 महाराष्ट्रीय लेखक व समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म सन १८५६ सालीं झाला.  गृहस्थिति अगदीं गरिबीची असल्यामुळें आपल्या आप्तांच्या आश्रयानेंच यांनीं रत्नागिरीस व वऱ्हाडांत विद्याभ्यास केला. सन १८७५ सालीं म्याट्रिक्युलेशन परीक्षा पास होऊन हे डेक्कन कॉलेजांत आले.

आजची बोधकथा

एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी त्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला म्हणाला," तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच लाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससापण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली, ससा गाईला म्हणाला,"तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव." गाय म्हणाली,"आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे." तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला," तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव" घोडा म्हणाला,"मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही मी तुला कसे पाठीवर घेवू?" तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला,"मित्रा तू तरी मला मदत कर" गाढव म्हणाले" मी तर आता घरी चाललो तू बघ" मग शेवटी ससा बकरी कडे गेला म्हणाला,"बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?" बकरी म्हणाली,"अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ" एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला,"असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे!!"


तात्पर्य- मित्राची खरी ओळख संकटात होते. आपले म्हणणारे संकटात सोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.