Wednesday 11 June 2014

अपयश


     खरच आयुष्यात अपयश पचवण खूप कठीण असत. आपल्या स्वप्नाना विरून जाताना पाहाण खूप क्लेशदायक असत. चहुबाजूंनी निरोपाचा अंधार दाटून येतो. प्रयत्न, देव, आशीर्वाद या सगळ्यावरचा विश्वास विस्श्वास उडून जातो. जीवनावरची श्रद्धा हरवून जाते.पुढे काही करण्याची जिद्दच राहत नाही. हे सारा साहजिक आहे. पण या अपयशाकडे पाहण्याचा  दृष्टीकोन थोडा बदलला तर मात्र अपयश नक्कीच सुसह्य होऊ शकते. तो आपल्या आयुष्यातला एक Turning Point होऊ शकतो.

      अपयश म्हणजे मनुष्याच्या आत्मिक बलाची कसोटीच ! अपयश म्हणजे सोशिकतेची, हिंमतीची, जणू सत्वपरीक्षा ! तिथेच माणूस तावून सुलाखून निघतो. अपयश म्हणजे कलाटणी, जीवनाकडे नव्या, वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी!


      अपयश म्हणजे तरी काय? जिथे साऱ्या आशा, आकांक्षा , स्वप्ने एकवटलेली असतात तिथेच पराभव, अगदी अनपेक्षित असे अतीव दुख ना?


      पण खरं सांगू, या दुखाला आपलंसं करावं, त्याने बंद केलेलं एक दार सोडून द्यावं. ते बंद झाल्याने उघडली गेलेली बाकीची हजार दारे मोकळ्या मनाने पाहावीत, आपल्याला हवेसे वाटेल त्या दाराने आयुष्याला आत न्यावे. सगळा जीव ओतून पुन्हा नव्याने उभं राहावं. एक नवीन विश्व उभारून अनपेक्षित का असेना; पण एक छान स्वप्न साकारावे, सुखाच्या पावलांनी आलेल्या या दुखाला सुखाचे साजरे रूप द्यावे. मनात ठरवलेलं जुनं क्षितीज विसरून नव्या क्षितिजाकडे स्वतःला झोकून द्यावे आणि हे सारं करताना जुन्या अपयशाला, त्या अतीव दुखाला हळुवार विसरून जावे. जीवनात सुखी होण्यासाठी पुन्हा नव्याने उभे राहाण्यासाठी आणखी काय हवे?

गंगा सालगुडे 
(म्हसवड,सातारा)
९४२२२५१०८१

No comments:

Post a Comment