Friday 29 November 2013

राज्यस्तरीय शिक्षण परिषदेनंतर आलेल्या प्रतिक्रियांबद्दल

नमस्कार 
     दि.२५/११/२०१३ रोजी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये सर्व शिक्षण तज्ञ, अधिकारी, पदाधिकारी व जेष्टांसमोर मला माझ्या छोट्याश्या कार्याची रूपरेषा मांडण्याची जि खूप मोठी संधी मिळाली हि संधी माझ्यासाठी एक आव्हान होती, पण
अनातले कुतूहल, अंतस्थ प्रेरणा, मित्रांची कौतुकाची थाप यामुळे ते आव्हान पेलण्याची एक अदृश्य शक्ती निर्माण झाली आणि मग मनातली धडपड, तळमळ, इच्छा हे सर्व परिषदेत उपस्थितांसमोर व्यक्त कराव....हि भावना मनात निर्माण
झाली.... मग काय .... गेलो स्टेजवर आणि अगदी थोडक्यात माझ्या भावना मी व्यक्त केल्या त्यामध्ये ना औपचारिकता होती ..... ना सुवचने....ना अलंकारिक भाषा होती .... ना कोणाला आवडेल ना आवडेल याची चिंता..... होती ती फक्त साधी आणि सोपी भाषा .....
"उगाचच वळवून, फिरवून भाषा वापरली आणि अवजड शब्दांची रचना केली कि ऐकणार्याला जेव्हड अवघड वाटतं.... त्यापेक्षा सांगणार्याला ते अवघडल्यासारख वाटतं......असं आपलं मला वाटतं......
      आता हेच पहा कि आमच्या केंद्रातील शिक्षक संख्या व त्यांची नवे कळण्यासाठी मी microsoft ऑफिस  मध्ये एक शिक्षकांची याधी तयार केली त्यानंतर ती word ची file मी pdf मध्ये convert केली मग मी ती फाईल माझ्या ब्लोगवर upload केली........ एव्हडं सगळं सांगून अवघडन्यापेक्ष्या  आणि समोरच्याला गोंधळात टाकण्यापेक्ष्या ..... "शिक्षकांची एक यादी केली....अन ती ब्लॉगवर टाकून दिली" .....या भाषेत संगनं मला बरं वाटलं..... त्यामुळे झालं काय कि "अरे हे तर फार सोप्प आहे...असं ऐकणार्याला वाटलं......आणि माझं सांगितलेलं समोरच्यांना पटतंय हे पाहून मलाही बरं वाटलं..... 
माझ्या या १३ मिनिटांच्या मनोगतानंतर मात्र : 
  1. माझ्या ब्लॉगवरील भेटी वाढल्या .....
  2. अनेकांनी मला भेटून माझे अभिनंदन केले....
  3. कोणी मला फोन करून शुभेच्छा दिल्या.....
  4. कोणी एस एम एस करून पुढील वाटचालीस शुचेच्छ दिल्या....
  5. कोणी इमेल करून हा वेगळा उपक्रम आवडल्याचे कळवले .....
  6. कोनाला भाषण चांगले असे वाटले.....
  7. कोणी म्हटले केंद्राप्रमुखाची व्यथा मांडल्याबद्दल आभार.....
  8. कोणाला बीडची (मराठवाड्याची) भाषा चांगली वाटली.....
  9. कोणाला या भाषेला सातारी किनार असल्याचे जाणवले.....
आता हे एवढं सगळं कोणाला कसं आणि का वाटलं हे मात्र मला काही कलालं नाही..... शेवटी कोणाला कशात काय दिसेल याचा काही नेम नाही......हेच खरं ......
                     असं  म्हटलं जातं कि मोठमोठ्याने वाजणारे ढोल आणि ताशे मोठा आवाज करत येतात आणि थोड्या वेळाने ते हवेत विरून जातात..... पण सनीचा एखादाच स्वर असा असतो कि तो थेट अन्तःकरणापर्यंत पोचतो आणि तेथेच रेंगाळतो ......कारण तो निघालेलाच असतो अगदी मनापासून आणि मनापर्यंत पोह्च्ण्यासाठीच.....
      त्यामुळे फक्त एवढेच म्हणेन कि फक्त मनापासून काम करावे..... ते मनापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही.....
कधीही न संपणाऱ्या यादीमध्ये ....
अगोदरच असणार्या सर्व मित्रांना सलाम.....
नव्याने आगमन झालेल्या मित्रांना प्रणाम .....
आणि या लेखनप्रपंचाला इथेच पूर्णविराम.....
पुन्हा एकदा नव्याने भेटण्यासाठी ..........
आपला सर्वांचा सदैव ऋणी 
राम सालगुडे (उपशिक्षक) 

1 comment: