Thursday 18 January 2018

गोल्डन बॉटल ब्रश


गोल्डन बॉटल ब्रश

नावाप्रमाणेच आपल्या रंगाने व आकाराने मनाला भुरळ घालणारे हे गोल्डन बॉटल ब्रश नावाचे झाड शाळेच्या परिसरात हवेने इकडून तिकडे झोकांड्या खात डौलाने उभे राहत आहे...

मूळ ऑस्ट्रेलिया चे हे झाड 8 ते 10 फूट उंच वाढते. कोवळ्या हलक्या श्या पिवळसर पणामुळे ते सोनेरी सोनेरी दिसते. ते चांगले रुजेपर्यंत त्याला जास्त पाण्याची आवश्यकता असते. नाजूक फांद्या व नाजूक खोड असलेल्या या झाडाला कट करून हवा तसा आकार देता येतो. ही झाडे जास्त प्रमाणात व जवळ जवळ लावून सोनेरी कुंपणही करता येऊ शकते....

या झाडाची पूर्ण वाढ झाल्यावर नाजूक खोड व फांद्यांमुळे एखादा सोनेरी झेंडा हवेत लहरावा असे सुंदर दिसते तसेच उन्हाळ्यात या झाडाला पांढरी ब्रश सारखी फुले लागतात. झटपट वाढणारे हे ऑस्ट्रेलियन जातीचे गोल्डन बॉटल ब्रश जर सावलीत वाढवले तर हिरवे आणि भरपूर सूर्यप्रकाशात वाढवले तर सोनेरी दिसते...

अतिशय मनमोहक दिसणारे हे सोनेरी झाड सदाहरित असून यावर कोणताही रोग पडत नाही तसेच याला गुरे खात नाहीत...

बघू या गोल्डन बॉटल ब्रशमुळे शाळेची व परिसराची शोभा वाढते का....

No comments:

Post a Comment