Thursday 18 January 2018

सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स... विनीत वर्तक

सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स... विनीत वर्तक

३१ जानेवारी २०१८ रोजी एक अदभूत आणि तितकीच दुर्मिळ अशी घटना आपल्या आकाशात होते आहे. तब्बल १५२ वर्षांनी हि खगोलीय घटना पुन्हा होते आहे. ३१ मार्च १८६६ नंतर होणाऱ्या सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स साठी जगातले खगोल प्रेमी सज्ज झाले आहेत. ३१ जानेवारी २०१८ ला होणार चंद्रग्रहण अनेक गोष्टींसाठी स्पेशल असणार आहे. भारतातून ह्या ग्रहणाचा काही भाग दिसणार असून आपण सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स चे साक्षीदार होण्याची संधी सोडू नये. सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स म्हणजे काय हे जाणून घेण आणि त्याची एवढी उत्सुकता काय ह्यासाठी आपण थोड चंद्राबद्दल समजून घेऊ.

चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून पृथ्वीभोवती फिरताना ज्या कक्षेतून फिरतो. त्यात तो पृथ्वीजवळ हि येतो जेव्हा पेरीजी मध्ये असतो. साधारण ३६२,६०० किमी तर एपोजी किंवा लांब अंतरावर असताना पृथ्वीपासून ४०५,४०० किमी वर जातो. चंद्रग्रहण कसे होते तर चंद्राचा प्रकाश हा सूर्यापासून मिळतो. आपल्या कक्षेतून जाताना जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. त्या घटनेला आपण चंद्रग्रहण अस म्हणतो. जेव्हा दोन चंद्रग्रहण एकाच महिन्यात येतात तेव्हा त्याला ब्ल्यू मून अस म्हणतात. अशी अवस्था साधारण दोन ते अडीच वर्षात येत असते. त्यामुळे त्यात विशेष अस काही नाही. पण हीच स्थिती अजून एका गोष्टीबरोबर जेव्हा येते आहे. त्यावेळी तीच वेगळ महत्व असणार आहे. वर सांगितल्या प्रमाणे चंद्राच अंतर हे पृथ्वीपासून एकच नाही. त्यामुळे जेव्हा चंद्र आपल्या पेरोजी मध्ये असतो. तेव्हा त्याला सुपरमून अस म्हंटल जाते. पृथ्वीच्या जवळ आल्याने पृथ्वीवरून बघताना त्याचा आकार मोठा दिसतो. ह्या ३१ जानेवारी ला होणार चंद्रग्रहण ह्या साठी स्पेशल आहे कि ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होत आहे. ग्रहणाच्या १.२ दिवस फक्त आधी चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असणार आहे. त्यामुळे सुपरमून स्वरूपात त्याचा आकार ७ पटीने मोठा दिसणार आहे. त्याचवेळी हे ग्रहण ब्लू मून असणार आहे. म्हणजे एकाच महिन्यात आलेल दुसर चंद्रग्रहण असणार आहे. अश्या तऱ्हेची चंद्राची स्थिती तब्बल १५२ वर्षांनी येते आहे. त्यामुळे जगभरातील खगोलप्रेमी ह्या सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स ची आतुरतेने वाट बघत आहेत.

सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स नावावरून चंद्र निळा दिसणार अस नाही. पण तो तांबूस रंगाचा गोळा दिसणार आहे. तांबूस रंग कसा आणि अस का होते? ह्यासाठी आपल्याला सावली च विज्ञान समजून घ्यावं लागेल. पृथ्वी जरी आकाराने मोठी असली तरी चंद्रावर पृथ्वीची नेहमीच सावली पडेल अस नसत ते त्याच्या कक्षेमुळे. सावली हि उंब्रा आणि पेनुम्ब्रा अश्या भागात विभागली जाते. ह्यातील उंब्रा ह्या भागात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पूर्ण चंद्रग्रहणाचा अनुभव येतो. पृथ्वीची सावली चंद्राला पूर्ण झाकोळून टाकते तर पेनुम्ब्रा भागात असणाऱ्या व्यक्तीला पूर्ण सावलीचा अनुभव येत नाही. म्हणजे सूर्याचा थोडा प्रकाश हा चंद्रावर पडतो. जरी पृथ्वीच्या सावलीने सूर्याचे किरण अडवले असले तरी पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्याचा प्रकाश हा झुकतो. ज्या पद्धतीने वातावरण हा प्रकाश झुकवते त्यामुळे लाल- तांबूस रंगाचे किरण चंद्राला त्याचा नेहमीचा पांढरा प्रकाश सोडून तांबूस रंगाचा प्रकाश देतात. म्हणून ह्या अवस्थेत असताना चंद्र रक्तासारखा लाल-तांबूस दिसतो. म्हणूनच ह्याला ब्लड मून अस म्हणतात.

भारतातून जरी पूर्णवेळ चंद्रग्रहण दिसणार नसल तरी आपल्याला ह्या अदभूत घटनेच साक्षीदार होता येणार आहे. सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स हे ग्रहण आपण आरामात उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. त्यामुळे ग्रहणाचा आनंद अजून चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे. भारतात चंद्रोदय होण्याआधीच ग्रहण लागलेल असणार आहे. तरीही थोड का होईना अतिशय दुर्मिळ अश्या एका खगोलीय घटनेला साक्षीदार होण्याची संधी आहे. हि संधी हुकल्यास पुढे २०२८ किंवा २०३७ पर्यंत वाट बघावी लागणार आहे. तेव्हा डोन्ट मिस द सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स.

No comments:

Post a Comment