Wednesday, 18 June 2014

आजचा सुविचार

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

आजचा दिनविशेष

झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन १८५८

राणी लक्ष्मीबाई
टोपणनाव: मनू
जन्म: नोव्हेंबर १९, इ.स.१८३५
काशी, भारत
मृत्यू: जून १८, इ.स. १८५८
झाशी, मध्य प्रदेश
चळवळ: १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
प्रमुख स्मारके: ग्वाल्हेर

आजची बोधकथा

एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांगमी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते! 

तात्पर्य : काहीजणांना आपण फार मोठे आहोत असं वाटतं. पण त्यांना लोक काडीची किंमत देत नाहीत।

Tuesday, 17 June 2014

शाळा प्रवेशोत्सव

जि. प. प्राथ. शाळा माळवाडी (वरकुटे-म्हसवड) येथे आज शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक संघ, पालक शिक्षक संघ, ग्रा.प.सदस्य, पालक, ग्रामस्थ यांचे  उपस्थितीत शिक्षण प्रवेशोत्सव साजरा करणेत आला. यावेळी नवागतांचे स्वागत, गुढीपूजन, प्रभातफेरी, पुस्तकवाटप, उपस्थिती प्रतिज्ञा, हळदी कुंकू आदि कार्यक्रम घेणेत आले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.छाया किसन खरात, उपाध्यक्षा सौ. अर्चना किसन निकम, सदस्य शंकर नामदेव दोलताडे, सदस्या विमल बाबुराव गायकवाड, मंगल नारायण वाघमारे, आनंदीबाई शिवाजी जाधव, सुभाष जाधव, नवनाथ बबन जाधव...इ पालकांच्याउपस्थितीत नवागतांचे स्वागत तसेच गुढीपूजन व पाठ्यपुस्तकांचे वाटप, करण्यात आले.
या कार्यक्रमाचे फोटो : 

आजचा सुविचार

जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

आजचा दिनविशेष

गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी
 
गोपाळ गणेश आगरकर  (१८५६-१८९५) -
 महाराष्ट्रीय लेखक व समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म सन १८५६ सालीं झाला.  गृहस्थिति अगदीं गरिबीची असल्यामुळें आपल्या आप्तांच्या आश्रयानेंच यांनीं रत्नागिरीस व वऱ्हाडांत विद्याभ्यास केला. सन १८७५ सालीं म्याट्रिक्युलेशन परीक्षा पास होऊन हे डेक्कन कॉलेजांत आले.

आजची बोधकथा

एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी त्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला म्हणाला," तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच लाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससापण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली, ससा गाईला म्हणाला,"तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव." गाय म्हणाली,"आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे." तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला," तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव" घोडा म्हणाला,"मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही मी तुला कसे पाठीवर घेवू?" तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला,"मित्रा तू तरी मला मदत कर" गाढव म्हणाले" मी तर आता घरी चाललो तू बघ" मग शेवटी ससा बकरी कडे गेला म्हणाला,"बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?" बकरी म्हणाली,"अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ" एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला,"असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे!!"


तात्पर्य- मित्राची खरी ओळख संकटात होते. आपले म्हणणारे संकटात सोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.

ऑनलाईन खरेदी करण्यासाठी संकेतस्थळे



अलिकडच्या काळात ऑनलाईन खरेदी हा पर्याय उपलब्ध झाल्यापासून आपल्यापैकी अनेक वाचनप्रेमी स्वतःच्या आवडीच्या पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी झटू लागले आहेत. मी ही त्याला अपवाद नाहिये. ऑनलाईन खरेदी करण्यासाठी  संकेतस्थळे
फ्लिपकार्ट.कॉम : http://www.flipkart.com/all-categories/pr?sid=search.flipkart.com&affid=crcmardig&query=

Monday, 16 June 2014

आजचा सुविचार

सद्‍गुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

आजचा दिनविशेष

आज बॅ. चित्तरंजन दास स्मृतिदिन

चित्तरंजन दास 
(५ नोव्हेंबर १८७०–१६ जून १९२५).

चित्तरंजन दास स्मृतिदिन हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात. त्यांचा जन्म कलकत्ता येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दासांचे मूळ घराणे विक्रमपूर परगण्यातील. वडील भुवनमोहन कलकत्त्यात वकिली करीत. ते ब्राह्मो समाजाचे होते. चित्तरंजनाचे शिक्षण कलकत्त्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९० मध्ये ते आय्. सी. एस्. परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचारसभांतून भाषणे दिली. याच वेळी मॅक्लिन नावाच्या एका इंग्रजाने हिंदी जनतेविषयी अनुदार उद्‌गार काढले. तेव्हा हिंदी लोकांची सभा घेऊन चित्तरंजनांनी मॅक्लिनचा निषेध केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी चळवळ करून त्याचे संसदेतील सभासदत्व रद्द करविले. याचा परिणाम म्हणूनच आय्. सी. एस्. परीक्षेत ते यशस्वी होऊ शकले नाहीत व अखेर बॅरिस्टर होऊन त्यांना भारतात परतावे लागले (१८९३). विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी तसेच बंगाली साहित्याचा अभ्यास केला.

आजची बोधकथा

एक ऋषी ब-याच काळा पासून यज्ञ करायचा प्रयत्न होते परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते. त्यांच्या आश्रमा पासून तेंव्हा राजा विक्रमादित्य चालले होते. त्यांनी त्या ऋषींची हि उदासी पाहिली आणि म्हणाले," ऋषिवर! तुम्ही असे उदास का? माझ्या राज्यात तुम्हाला काही त्रास होतो आहे का? माझ्या राज्यातील कोणी उदास, निराश राहिलेले मला योग्य वाटत नाही." 
त्यावर ऋषी म्हणाले," महाराज! मी ब-याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करतो आहे पण जसा अग्नी मला अपेक्षित आहे तसा तो माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही." त्यावर राजे विक्रमादित्य म्यानातील तलवार काढून म्हणाले," एवढीच गोष्ट आहे ना! मी आता या क्षणी संकल्प करतो कि, जर आज संध्याकाळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी माझे शीर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईन." यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेव राजांना म्हणाले," मी तुझ्या वर प्रसन्न आहे! वर माग! " त्यावर राजा म्हणाले " या ऋषींची इच्छा पूर्ण करा ! त्यांचा यज्ञ संपूर्ण करा! त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांच्छित फळ त्यांना मिळू दे!" यावर ऋषी म्हणाले " राजा ! तुम्ही एकतर अग्नीस प्रसन्न करून घेतले. पण मी हि खूप प्रयत्न केले होते कि! पण आपण काही आहुत्या दिल्या आणि अग्नीस प्रकट कसे काय केले? " यावर राजा काही बोलण्या आधीच अग्निदेव उत्तरले," ऋषिवर! राजाने जे काही केले त्यात त्यांचा स्वत:चा काहीच हेतू नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपुर्वक केले होते. त्यामुळे ते कार्य सफल झाले. म्हणून मी त्वरित प्रकट झालो."

तात्पर्य-संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करते.

Thursday, 12 June 2014

आज वडाची पूजा कराच...!!!

       जेष्ठ महिन्यात येणारी पोर्णिमा हि वटपोर्णिमा या नावाने ओळखली जाते हि पोर्णिमा विशेष मानली जाते याची अनेक कारणे आहेत... यातील कोणतेही एक कारण निवडा आणि आज वडाची पूजा कराच. साधारणतः खालीलप्रमाणे वटपोर्णिमा हे व्रत महत्वपूर्ण व्रत असल्याची कारणे सांगता येतील....
  1. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास ठेवून व्रत करतात.
  2. या दिवशी वडाची आणि यमाची पूजा केली जाते.
  3. शतपत ब्राह्मण मध्ये वृक्षांना शिव आणि यजुर्वेद मध्ये शिवाला वृक्षांचा स्वामी म्हटले आहे.
  4. वडाच्या झाडाखालीच गतप्राण झालेल्या सत्यवानाला नवजीवन प्राप्त झाले होते.
  5. काही धर्मग्रंथांच्या मते वडाच्या झाडांच्या मुळामध्ये ब्रह्मा, खोडांमध्ये विष्णू आणि पानांमध्ये शिवाचा वास असतो.
  6. वडाच्या झाडाला देववृक्ष म्हटले जाते.
  7. एक पौराणिक कथा अशीही आहे की जेंव्हा मार्केंडेय ऋषींनी देवाला दर्शन देण्याची याचना केली तेंव्हा देवाने प्रलयाचे दृश्य दाखवून वडाच्या झाडाच्या पानांमध्ये पायाचा अंगठा चोखत असतानाचे बाळ रुपात दर्शन दिले.
  8. वनवासात असताना श्रीरामाने कुंभज ऋषींच्या सांगण्यावरून पंचवटीला निवास करणे पसंत केले.
  9. पंचवटी म्हणजे पाच वडांच्या सहाय्याने तयार झालेले स्थान होय.
  10. आयुर्वेदात वडाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते कारण आयुर्वेदात केल्या जाणार्या उपचारांमध्ये याचे पाचही अंग (मूळ, खोड, पान, फुल आणि फळ ) उपयोगात येतात.
  11. अथर्ववेदानुसार पर्यावरणाची शुद्धी जल, वायू आणि वनस्पती यावर अवलंबून असते आणि वटवृक्ष वातावरणातील शीतलता आणि शुद्धता टिकवून ठेवतो. 
  12. दशपुत्रास्मो द्रुम: (अर्थात एक वृक्ष हा दहा पुत्रांच्या समान असतो.) या शब्दात वृक्षांचे महत्व मस्त्यपुराणातही सांगितलेले आहे.
  13. यासारखे बरेचसे दृष्टांत वडाच्या झाडाचे अध्यात्मीक महत्व किती आहे हे दाखवून देतात. धार्मिक गोष्टी मानायच्या की नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण वडाच्या झाडाचे महत्व लक्षात घ्यावे.
  14. प्रकाशाच्या मदतीने वृक्ष हे प्राणवायू तयार करतात आणि आपणास ऑक्सिजन रुपी जीवनशक्ती पुरवतात.
  15. वृक्ष स्वतः कार्बनडायाॅक्साइड रुपी विष प्राशन करून  ऑक्सिजनरुपी अमृत पुरवतात.
  16. वडाचे  झाड सर्वात जास्त कार्बनडायाॅक्साइड  घेऊन ऑक्सिजन सोडते.
  17. वृक्षांमुळेच धरतीवर जीवन टिकून आहे. 
  18. वटपोर्णिमेचे व्रत हे आपणा सर्वांना पर्यावरणाशी जोडते. 
  19. हे वृत आपणास पर्यावरणाप्रती जागरूक होण्याचा आणि वृक्षांना वाचवण्याचा कल्याणकारी संदेश देते. 
                            वरीलपैकी कोणतेही एक कारण घ्या आणि आज स्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाची पूजा कराच... कारण आज सर्वांनी केलेली हीच पूजा ते झाड तोडताना आपणास आठवेल आणि वृक्षांचा अंधाधुंद विनाश थांबला जाईल अन्यथा पृथ्वीवरचे हे जीवन संपण्यासाठी वेळ लागणार नाही मग ना कुठलाही पुरुष राहील ना कुठली पतिव्रता...!!!