आजचा सुविचार
या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.
आजची बोधकथा
रुमाल
‘ रुमाल ’ हा शब्द मोठा मजेशिर आहे . लहाणपणी गावात रुमालमध्ये
लोक सामान , भाजीपाला बांधून नेत असल्याचे मी पाहिलेले आहे . त्यामुळे ‘
रुमाल ’ म्हणजे भाजीपाला बांधून नेण्यासाठीजवळ बाळगावयाचा चौकोनी कापड .
असा लहानपणी माझा समज होता . अर्थात वाढत्या वयाबरोबर हा गैरसमज असल्याचेही
लक्षातआले. दुपट्टा आणि रुमाल हे एकाच कुळातले , पण दुपट्टा आकाराने मोठा
म्हणून तो रुमालाचा मोठा भाऊ! तसेच शहरी भागात कुणी फारसा दुपट्टा वापरत
नाही . शहरात रुमाल वापरतात आणि ग्रामिण भागात गळ्यात दुपट्टा टाकलेले लोक
हमखास भेटतात . या अर्थानेदुपट्टा हा खेड्यात राहणारा तर रुमाल हा
त्याचाशहरात राहणारा भाऊ! स्वातंत्र्याचे म्हणाल तर दुपट्टा अधिक स्वतंत्र
आहे .तो गळ्यात छानपणे लोंबकाळत असतो. मस्तपैकी ताजी हवा खात असतो . पण
रुमालाला फडकवण्याचे स्वातंत्र्य नाही. त्याची सदा घडी केलेली आणि खिशात
कोंबलेली . स्वच्छ – मोकळी हवा रुमालाच्या नशिबातनाही पण काही का असेना !
रुमाल आणि दुपट्टा हे दोघेही अत्यंत उपयुक्त हे मात्र तितकेच खरे . सर्दी
झाली असेल , तर हे सत्य मान्य करायला मिनिटभर वेळ लागणार नाही . असेच एकदा
एकटी बसली होती . रुमाल काढला . त्याने चेहरा पुसला ! रुमालाकडे मी निरखून
पाहीले एखाद्या परोपकारी व्यक्तीने दुसर्याचे कष्ट आपल्या अंगावर घ्यावे
त्याप्रमाने रुमालाने माझा घाम टिपुन घेतला होता . गंमत म्हणुन मी त्या
रुमालाला गाठी पाडायला सुरुवात केली . पहिली गाठ पाडली , मग दुसरी , मग
तिसरी, अशा जेवढ्या गाठी येतील तेवढ्या गाठी मी त्या रुमालाला पाड्ल्या.
आता तो रुमाल न दिसता गाठी पाडलेल्या एखाद्यादोरी सारखा दिसत होता .
त्याच्या त्या रुपाकडे पाहून माझ्या मनात विचार आला , “ आता हाघाम पुसू
शकेल काय ? ” अर्थातच त्या गाठिच्या रुमालालाघाम पुसणे शक्य नव्हते . मन
आणखी पुढे विचारकरू लागले . रुमाल हा आमचे व्यक्तिमत्त्व , वाईट सवई या
गाठिसारखा ! त्या जडल्या की व्यक्तिची उपयुक्तता संपली
तात्पर्य :- वाईट सवई जडल्या की व्यक्तिची उपयुक्तता संपली.