आजचा सुविचार
माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.
आजची बोधकथा
"एका माणसाने आपला नेहमीचा वेष बदलला, ......... दाढी वाढविली, गळ्यात
सोन्याची जाड चेन, हातात ३ जाडजूड अंगठ्या घातल्या व भारतातील सर्वात
मोठ्या महाविद्यालयातील मुख्यधापकाकडे नोकरी मागण्यासाठी गेला,
माणूस :- नमस्कार, मी विद्यार्थाना अतिशय चांगल शिक्षण देईन, चांगले संस्कार लावेन असे मी आश्वासन देतो ... मला नोकरी द्या.
मुख्यधापक :- इथे अतिशय उच्चशिक्षित लोकांना सुद्धा नोकरी मिळणे अवघड आहे, तसेच तुम्ही तर एका गुंडा सारखे दिसता, तुम्ही आमच्या विद्यार्थांचे आणि ह्या महाविद्यालयाचे भवितव्य काय घडविणार ?
माणूस :- ठीक आहे तर मग मी ह्या महाविद्यालयाचे विश्वस्त जे भारताचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो.
मंत्री :- मुख्यधापक जे म्हणत आहेत ते बरोबर आहे ......... महाविद्यालयात सुशिक्षित
शिक्षकाची गरज आहे, तुमच्या सारखे लोक विद्यार्थांचे व ह्या महाविद्यालयाचे भवितव्य
कसे घडवू शकणार ?
(हे ऐकून तो माणूस हसू लागतो ........ आपला खराखुरा वेष समोर आणून म्हणतो....)
माननीय मुख्यधापक व मंत्री साहेब ......... जर एका महाविद्यालयाचे व विद्यार्थांचे भवितव्य घडविण्यासाठी अतिशय उच्चशिक्षित शिक्षकाची जरुरी आहे, तर आपल्या ह्या मोठ्या भारत देशाचे व भारत वासियांचे भवितव्य घडविण्यासाठी सुद्धा नगरसेवकापासून ते पंतप्रधानांपर्यंत उच्चशिक्षित लोकांची गरज आहे.
मी माझी वेशभूषा बदलून तुमच्यापर्यंत तुम्हाला हीच गोष्ट पटवून देण्यासाठी आलो होतो ....... कृपया भारत देशाला महाविद्यालया एवढेच महत्व देऊन उच्चशिक्षित लोकांची भरती आपल्या सरकार मध्ये करावी.