Saturday 28 September 2013

आजचा सुविचार

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

आजची बोधकथा 

 "सांगली जवळील खेड्या मध्ये एक वृद्ध माणूस राहत होता, त्याची इच्छा होती कि घरासमोरील अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण हे खूप कष्टाचे काम आहे, ........ आणि दुर्दैवाने त्याचा मुलगा तुरुंगात होता, त्यामुळे हे कसे होणार, असे म्हणून तो आपल्या मुलाला एक पत्र लिहितो,

"राजू,
तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती कि आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण त्यासाठी सारे आंगण खोदावे लागणार, मी तर थकलो आहे, तू इथे असतास तर मदत झाली असती"

दोनच दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून पत्र आले,

" बाबा, कृपया करून तुम्ही आपले आंगण खोदू नका, तिथे मी पिस्तुल व कार्तुस लपविली आहेत"

दुसर्या दिवशी सकाळी पूर्ण मुंबई पोलीस सांगली मध्ये दाखल झाली, त्यांनी पूर्ण आंगण खोदले पण त्यांना काहीच मिळाले नाही.

लगेच मुलाचे पत्र आले, " बाबा आंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा" ............ इथे बसून मी तुमच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे हेच करू शकतो.

तात्पर्य :- मनापासून काहीही करायचे ठरविले तर ते नक्की होते, मग तुम्ही दुसर्या गावी असूद्यात किंवा परदेशात असूद्यात.
एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील ट्रेन ने जात असतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे
जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात.
           त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
          तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...” तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो......
          ”तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..”
          आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत, माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”
 
कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..
- See more at: http://marathibodhkatha.blogspot.in/2011/10/blog-post.html#sthash.xi6z84ZS.dpuf