आजचा सुविचार
सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
आजची बोधकथा
गरुडाचे
अंडे एका कोंबडीच्या पंखाखाली ठेवले, यथावकाश अंडे उबवल्यावर त्यातून
गरुडाचे पिल्लू पडलं. पण ते सदासर्वकाळ कोंबडीच्या इतर पिल्लांबरोबर राहत
असल्याने त्याने स्वत:ला कधीच ओळखले नाही व ते स्वत:ला कोंबडीचे पिल्लू
समजू लागले. कोंबडीच्या पिल्लांच्या अनुकरणामुळे घाणीत अडकलेले धान्याचे कण
वेचणे, कर्कश्य आवाज करत इकडेतिकडे हिंडणे यातच त्याचा वेळ जावू लागला.
त्याला जमिनीपासून फारसे उंच उडता येत नसे. कारण डौलदारपणे उड्डाण
करणाऱ्या गरुडाकडे त्याचा लक्ष गेलं आणि बरोबरीच्या कोंबडीच्या पिल्लांना
त्याने विचारला,"हा कोणता पक्षी आहे? किती उंच उडतो आहे? त्याचा रुबाब
सुद्धा पाहण्यासारखा आहे." हे एकच त्यातील कोंबडीचे पिल्लू त्याला
म्हणाले," तो गरुड पक्षी आहे. अतिशय सामर्थ्यवान पक्षी! पण आपल्याला कुठे
त्याच्यासारखा उडायला येणार.कारण आपण पडलो कोंबडीची पिल्ले. तू पण त्यातलाच
एक.त्यामुळे त्याचा रुबाब हा फक्त बघ." अशा या उत्तराने गरुडाच्या
पिल्लाचे समाधान झाले. त्याने काहीही विचार न करता स्वत:ला कोंबडीचे पिल्लू
मानून घेतलं. आपण हि कोंबडी आहोत असेच गरुडाचे पिल्लू म्हणू लागले.
स्वत:ला ओळखण्याच्या दृष्टीअभावी स्वत:चा उज्ज्वल वारसा त्याला कधीच लाभला
नाही, तो एका कोंबडीचे पिल्लू म्हणून जन्माला आला आणि कोंबडीचे पिल्लू
म्हणूनच मेला. ! यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या
काल्पनिक मर्यादेमुळे अपयशी जीवन जगावे लागले.
तात्पर्य-
आपल्यातील कर्तुत्वाला वाव आपणच दिला पाहिजे, आपण आपल्या क्षमता जर ओळखल्या नाहीत तर अपयशाचे धनी व्हावे लागते.
आपल्यातील कर्तुत्वाला वाव आपणच दिला पाहिजे, आपण आपल्या क्षमता जर ओळखल्या नाहीत तर अपयशाचे धनी व्हावे लागते.