Wednesday, 30 October 2013

देशात डिसेंबरअखेरपर्यंत सरकारी कार्यालयांमध्ये ई-मेलचा वापर करण्यासाठी जीमेल व याहूसारख्या खासगी कंपन्यांच्या ई-मेल सेवा बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
देशातील सरकारी कार्यालयांमध्ये माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी खासगी कंपन्यांच्या ई-मेलचा वापर करण्यात येतो. मात्र, सरकारी कामांसाठी सरकारी ई-मेलचा वापर करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यामुळे डिसेंबरनंतर खासगी ई-मेलचा वापर करता येणार नाही.

द डिपार्टमेंट ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी (डीईआयटीवाय) सरकारी कामांसाठी ई-मेलची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या यंत्रणेकडून जवळपास काम पूर्णपणे झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत सरकारी ई-मेल सुविधा सुरू करण्यात येईल, असे "डीईआयटीवाय'चे सचिव जे. सत्यनारायण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.