Tuesday, 12 November 2013

श्रीमंती विचारांची असावी

         श्रीमंती म्हणजे फक्त पैसा असणे नव्हे. तुमच्याकडे बँकेत भरपूर
पैसे असतील, भरपूर दौलत असेल पण जर ताण असेल पण जर त्याचा तुम्हाला ताण येत असेल, त्रास होत असेल तर कोणीही तुम्हाला श्रीमंत म्हणू शकणार नाही. श्रीमंती म्हणजे  भरपूर पैसे नव्हे, तर  आयुष्यातील उदारता ओळखणे, त्याला महत्व देणे, आयुष्याचा सन्मान करणे. 
        माणसामधला विश्वास त्याची श्रीमंती दाखवतो. श्रीमंती तुम्हाला कशासाठी हवी आहे? आत्मविश्वास वाढवणे..बरोबर? पण जर त्यामुळे कमजोरी वाढत असेल तर त्या श्रीमंती चा काहीही उपयोग नाही, जर श्रीमंतीमुळे आजारपण वाढले असेल तर ती श्रीमंती नाही, श्रीमंती जर भांडणाचे कारण बनत असेल तर ती श्रीमंती नाही, बरोबर! ज्ञान म्हणजेच श्रीमंती, विद्या म्हणजे श्रीमंती, आरोग्य म्हणजे श्रीमंती, आत्मविश्वास म्हणजे श्रीमंती, मुल्ये म्हणजे श्रीमंती. जर तुमच्यामध्ये विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता, कुठलीही परिस्थिती सांभाळू शकता, ती श्रीमंती आहे. 
           आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे विचार माणूस पैशाने श्रीमंत किंवा गरीब नसतो तर तो विचाराने गरीब किंवा श्रीमंत असतो.

डॉ.भास्कर पोटघन 
(उपशिक्षणाधिकारी,जि.प.सातारा)