संगणकाच्या प्रयोगशाळेत
जायचे, थोडा वेळ शिकायचे आणि तास संपला की वर्गाबाहेर यायचे. बहुतांश शाळांत असेच
होते. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना संगणकाच्या
प्रयोगशाळेतून बाहेर येणे अजिबात आवडत नाही. या शाळेतील संगणक प्रयोगशाळेचा सर्व
कारभार विद्यार्थीच पाहातात. वेळप्रसंगी संगणक दुरुस्तीमध्येही विद्यार्थी मदत करत असतात.
शिरगावच्या या शाळेमध्ये काही वर्षांपूर्वी न्यू
कॅसल विद्यापीठाने 'सोल' (सेल्फ ऑर्गनायझिंग लर्निग एन्व्हायर्मेट) हा
उपक्रम सुरू झाला. या उपक्रमांतर्गत
शाळेत संगणक आणि इंटरनेटने सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात आली होती. यानंतर ऑनलाइन व्याख्याने व विविध संगणकीय उपक्रम सुरू झाले. सुरुवातीला शिक्षकांनी सांगायचे आणि विद्यार्थ्यांनी करायचे अशा या प्रयोगामध्ये आता नेमके उलटे चित्र आहे. विद्यार्थी या उपक्रमासाठी थाटलेली प्रयोगशाळा सांभाळतात आणि विविध उपक्रम राबवितात. यावर शिक्षक केवळ देखरेख करतात.या प्रयोगशाळेत सध्या एक नवा प्रयोग सुरू केला असून याअंतर्गत विद्यार्थ्यांचे काही संघ तयार करण्यात आले आहेत. हे संघ आपल्या शाळेच्या वेळाव्यतिरिक्त या प्रयोगशाळेत जातात आणि 'टीईडी डॉट कॉम' या वेबसाइटवरील मान्यवरांचे व्याख्यान ऐकतात. त्यावर इतर संघांबरोबर चर्चा करतात. यामध्ये जो संघ सादरीकरण करत असतो त्याला इतर संघ गुण देतात. यातून खेळीमेळीच्या वातावरणात अभ्यास तर होतोच; याशिवाय व्यक्तिमत्त्व विकासाचे धडेही मिळतात, असे शाळेचे शिक्षक शमसुद्दीन आत्तार यांनी सांगितले. याचबरोबर 'अरविंदगुप्ता टॉयज डॉट कॉम' या वेबसाइटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी १८७ मॉडेल्स तयार केली. त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फायदा झाला, असेही आत्तार यांनी सांगितले. अशाच प्रकारचे विविध उपक्रम इंटरनेटच्या माध्यमातून शाळेत होतात. ही प्रयोगशाळा यापूर्वी शिक्षक सांभाळत होते. पण आता त्यांची सर्व कामे विद्यार्थीच सांभाळत असल्याचेही आत्तार सांगातात.

अर्थकारणाची
समस्या
विद्यार्थ्यांना सुविधा मिळाल्या आणि त्याचे सोने करत त्यांनी
ई-शिक्षणाला सुरुवातही केली.
सुरुवातीला या उपक्रमाला अर्थसाहाय्य मिळत होते. पण मुदत संपल्यावर ते बंद करण्यात आले. आता ही सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या खिशाला कात्री लावावी लागत आहे. या गावात ही सुविधा मिळणेच महाकठीण होते. यामुळे सुरू झालेली सुविधा बंद पडू नये यासाठी शिक्षक आणि संस्थाचालक झटत आहेत. सध्या संगणकांमध्येही अडचणी येऊ लागल्या असून त्या दुरूस्त करण्यासाठी शिक्षकच वेळोवेळी पैसे खर्च करतात. शिवाय अंगमेहनतही करतात. मुख्याध्यापक विजय कदम आणि संस्थाचालक यांच्या सहकार्यामुळे काम करणे सोपे असले तरी या उपक्रमासाठी मोठी आर्थिक समस्या उभी राहात असल्याचे आत्तार सांगतात.

आयला
थॉमस यांच्याशी गप्पा
आर्जेटिनाचे तज्ज्ञ आयला थॉमस यांचे व्याखान या
प्रयोगशाळेत नियमित ठेवले जाते. दिवाळीच्या सुटीपूर्वी या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी थॉमस
यांच्याशी गप्पा मारताना मोठी सुटी लागणार असल्याचे सांगितले. यावरून दिवाळीविषयी त्यांच्या गप्पा रंगल्या. थॉमस यांना
फराळाविषयी प्रचंड उत्सुकता होती. म्हणून विद्यार्थी दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी फराळ घेऊन
आले आणि त्यांनी वेबकॅमच्या साह्याने थॉमस यांना चकल्या, लाडू दाखविले. लाडूचे वर्णन करताना विद्यार्थ्यांनी उच्चारलेला 'स्वीट बॉल' हा शब्द त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होत असून ते स्वत: विचार करू
लागल्याचे आत्तार सांगातात.
ई-शिक्षणाचे
आत्तार सरांचे धडे
आत्तार सरांनी http://www.snattar.pbwiki.com/
या नावानं विकीपेज
बनवले आहे. यामध्ये ते मुलांनी लिहिलेले निबंध, सुविचार, म्हणी, व्याकरण, विज्ञानविषयक माहिती, सारे काही अपलोड करतात. मुलांना माहितीची
गरज भासते, तेव्हा ते या लिंकवर जातात, आणि या माहितीचा वापर करतात. यामुळे
मुलांच्या दप्तरातील निबंधाच्या वह्य़ा, व्याकरणाची पुस्तके, आलेख वह्य़ा, चित्रकला वही अशांचे ओझे कमी झाले आहे. माझ्या शाळेतली मुले
स्काईपेचा वापर करून परदेशातील शाळांच्या शिक्षकांशी संवाद साधतात. शिकण्यास अनुकूल
वातावरण तयार केले, तर मुले आवडीने अभ्यास करतात, आणि शिक्षेची, समज द्यायची वेळ येतच नाही असे ते अभिमानाने सांगतात.