Wednesday 27 November 2013


आजचा सुविचार

व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

आजची बोधकथा
बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या. एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही."
बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला,"मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले.
तात्पर्य-
शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल " 

No comments:

Post a Comment