Saturday 23 November 2013

सी.एन.आर. राव

भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार क्रिकेटसूर्य सचिन रमेश तेंडूलकर आणि चिंतामणी नागेश रामचंद्र राव, ऊर्फ सी.एन.आर. राव यांना जाहीर केला आहे 
चिंतामणी नागेश रामचंद्र राव हे एक कन्नडभाषक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत...


आपले संपूर्ण आयुष्य विज्ञानाला वाहून घेतलेले आणि 'मिस्टर सायन्स ऑफ इंडिया' अशी ओळख असलेले ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. चिंतामणी नागेश रामचंद्र उर्फ सी.एन.आर. राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राव यांना याआधी पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवले आहेत. राव यांनी पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. चीन आणि भारत या देशांमधील वैज्ञानिक सहकार्य वाढीसाठी डॉ. राव यांचे मोठे योगदान आहे.
राव यांनी १९५१ मध्ये म्हैसूर विद्यापीठातून पदवी मिळवली. पुढील दोन वर्षांत त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण केला. त्यानंतर ते पीएच.डी. अभ्याक्रमासाठी अमेरिकेतील एड्रू विद्यापीठात प्रवेश घेतला. १९६३ ते १९७६ या काळात कानपुर आयआयटीमधील रसायनशास्त्र विभागात, तर १९८४ ते १९९४ या काळात बेंगळुरातील भारतीय विज्ञान संस्थेत अध्यापन केले. सध्या ते बेंगळुरातील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्रात संशोधक प्राध्यापक आणि मानद अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.


त्यांचे जीवन, संशोधन, कार्य ,भूषवलेली मानद पदे यांविषयी अधिक माहीतीसाठी.....त्यांची स्वत:ची website...

http://www.jncasr.ac.in/cnrrao/