तुझ्या जीवनमूल्यांना सलाम सचिन......
खर तर करोडो चाह्त्यांपैकीच मी एक सचिनचा फॅन आहे. त्याच्याविषयी आजपर्यंत
आपण अनेक माध्यमातून, वर्तमानपत्रातून, दृक्श्राव्य माध्यमातून
माहिती वाचली पहिली. आजही सचिनच्या जुन्या
खेळत असतानाच्या आठवणी जाग्या तर हृदयाची धडधड वाढते.सचिनने शतक केल्यावर किंवा चांगले खेळल्यावर जल्लोष
करणारा मीच आणि थोडे वाईट खेळल्यावर फोटो
फाडून त्याच्याशी अबोला धरणारही मीच....!!
आता २४
वर्षाच्या खेळीनंतर तो स्वत: क्रिकेट खेळण्यापासून निवृत्त होत आहे हि कल्पना करतानाही अवघड जात आहे. खरे तर इतके वर्ष खेळून, सातत्य ठेऊन त्याने च्याह्त्यांना जो आनंद दिला आहे तो शब्दात व्यक्त करणेही अशक्य आहे.
त्याच्या या २४
वर्षाच्या खेळीतून आपल्या शिकण्यासारखे खूप काही आहे.
खरे तर, या त्याच्या यशाचे गमक त्याने
त्याच्या अलीकडील काही मुलाखतीतून व्यक्त केले
आहे... व्यक्तिगत व व्यासायिक जीवनात
यश
मिळविण्यासाठी लागणारी सूत्रेच त्याने आपल्या खेळातून, जगण्यातून व्यक्त केली आहे.
1. सामान्यांना स्वप्न बघण्याचे धाडस करण्याचे त्याने शिकविले.
2. खरे तर यश महत्त्वाचं, पण ते फेव्हाच टिकते जेंव्हा
मूल्यांच्या मजबूत पायावर ते उभे असते अन सचिनने त्याच्या
खेळीमधून व्यक्तिगत जीवनात वागण्यातून
सिद्ध केलेले
आहे म्हणून आजही विरोधी टीममधील खेळाडू असो किंवा भारतीय संघातील इतर खेळाडू व चाहते सचिनच्या खेळावर फिदा आहेत.
3. खेळत असताना नेहमी उत्साह व जिज्ञासा जिवंत ठेवण्याचे कार्य
सचिनने केले. झालेल्या चुका सुधारून खेळ
केला. त्यामुळेच तो इतके वर्ष आपल्याला आनंद देऊ शकला.
4. सचिनने जागतिक पातळीवर
श्रेष्टता सिद्ध करून श्रेष्ठतेच्या शिखराची कस धरण्यास शिकवले. खरं तर श्रेष्ठ होणं, उत्तम असणे हे अस्थिर लक्ष्य
आहे व त्यासाठी आपली पातळी नेहमी उंचावण्याचे काम सचिनने केले.
5. ज्याप्रमाणे त्याने वरिष्ठ खेळाडू किंवा नवीन खेळाडू यांच्यामध्ये ताळमेळ
साधून भारतीय संघात संघभावना निर्माण
करण्याचे काम केले आहे.
6. प्रतिकूल परिस्थितीतही नेहमी
स्वीकारलेल्या सकारात्मक वृत्तीतून आत्मविश्वास वाढतो हेच त्याच्या खेळातून
आपल्याला दिसते.
7. यश मिळविण्यासाठी अनेक गोष्टी व लोक जबाबदार असतात हे त्याने
सातत्याने लक्षात ठेवले म्हणूनच त्याची
विनयशीलता, नम्रता आजही टिकून असलेली आपल्याला दिसते. म्हणजेच यशातही स्थिर कसे राहावे हे त्याने
त्याच्या खेळातून, वागण्यातून शिकविले.
काही माणसे स्वप्नात रमतात, काही वास्तवाशी सामना करतात
पण यशस्वी ते होतात जे प्रयत्न आणि
हिमतीने,
स्वप्नांना सत्यात उतरवतात.....!!!
-विजय चिंचोलीकर, बीड.